Homeguard Bharti 2024 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांनी आजच अर्ज करा | होमगार्ड भरती 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र होमगार्ड विभागाने 2024 साठी नवी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्डच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक तरुणांना सुरक्षिततेच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक अर्हता आणि पात्रता तपासून अर्ज करणे आवश्यक आहे. देशातील जास्तीजास्त नागरीकांना सैनिकी, तसेच आपतकालीन मदतकार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळित राखण्याचे प्रशिक्षण देवून जबाबदार व शिस्तप्रिय नागरीक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उददेश आहे.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि अन्य महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

होमगार्ड भरतीसाठी लागणारी पात्रता:

a) शैक्षणिक पात्रता – कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.

b) शारिरीक पात्रता:

  1. वय – २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी )
  2. उंची – पुरुषांकरीता – १६२ से. मी. महिलांकरीता – १५० से. मी.
  3. छाती – फक्त पुरुष उमेदवारांकरीता  (न फुगविता किमान ७६ से. मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक )

उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात ४०% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

Homeguard Bharti 2024 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला. ४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे –

१. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
२. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण. ३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार / पदके मिळविण्याची संधी.
५. स्वत:चा व्यवसाय / शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना:

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे . इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जांची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा